
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर
मा. विभागीय आयुक्त,अमरावती यांचे निर्देशानुसार व मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली 150 फलक छापण्यात आले असून यापैकी 132 फलक केळापूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात तसेच 18 सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहे. सदर फलकामध्ये लाभार्थी यांना स्वतःच्या धान्याची माहिती मिळणार असून तसेच ऑनलाईन प्रणाली द्वारे तक्रार दाखल करता येणार आहे. मेरा रेशन नावाचे अँप अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने तयार केले असून जिल्ह्यातील सर्व लाभार्थीनी अँप डाउनलोड करण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे(IAS)यांनी केले आहे. या फलकाचे अनावरण मा.जिल्हाधिकारी श्री अमोलजी येडगे (IAS) मा. श्रीकृष्ण पांचाळ (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, मा. श्री विवेक जॉन्सन (IAS)सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर, मा. श्री जगताप सर उपवनसंरक्षक पांढरकवडा व मा.जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुधाकर पवार यांचे शुभहस्ते करण्यात आले.
