प्रामाणिकता जीवंत असल्याचा सुखद प्रत्यय [गोपाल सांगानी यांनी पैशाचे पॉकेट केले परत ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

      

आधुनिक काळात प्रामाणिकता, आदर्श, मूल्य यांची प्रचंड गळचेपी होतं असल्याचा घटना आपल्या सभोवती सातत्याने घडतं असतात. अशा काळात एखादया प्रामाणिक घटनेचा प्रत्यय यावा असे उदाहरण समोर येते व आपल्या या समजाला धक्का पोहचतो मात्र हा धक्का सुखद असतो. वडकी येथे अशाच एका घटनेत पैशाने भरलेले पॉकेट सापडले असतांना ते ज्याचे त्याला परत करण्याचे दातृवं गोपाल संगानी यांनी दाखवले व पुन्हा एकदा प्रामाणिकता आजही जीवंत असल्याची प्रचिती आली
मेघा इंडेन गॅस एजन्सी राजूर येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले वडकी येथील गोपाल सांगानी हे नेहमीप्रमाणे राजूर येथील गॅस गोडाऊन वरून सिलेंडर घेऊन वाहनाने येत होते.अचानक भांदेवाडा ते लाखापुर दरम्यान रस्त्यावर पडून असलेले पैशाचे पाकीट हे त्यांच्या नजरेस पडले ,त्यांनी ते तात्काळ उचलून पाकीट चेक केले असता त्यामध्ये 3 हजार रुपये,एटीएम कार्ड 2,
आधारकार्ड ,पॅन कार्ड,व्होटिंग कार्ड,अमरावती बोर्डाची हॉल तिकीट, लायसन्स अशी वस्तू नजरेस पडली त्यानंतर लगेच त्यांनी आधारकार्ड पावतीवरील मोबाईल नंबर चेक केला असता त्यावरून समोरील व्यक्ती करणं मनोहर खंडाळकर वय २६ रा चिखलगाव यांचे ते पाकीट असल्याचे निष्पन्न झाले,जेव्हा त्याला संपर्क केला असता तो सहकारी मित्र अनिकेत क्षीरसागर याला घेऊन भांदेवाडा शिवारात हरपलेल्या पाकिटाची शोधाशोध करीत होता,तसेच वडकी येथील गोपाल सांगानी यांनी करन खंडाळकर याला संपर्क केला असता त्यांनी आपली शोधाशोध थांबविली व सुटकेचा श्वास घेतला.ह्यावेळी करन याने पाकिटातील पैशापेक्षा परीक्षेची हॉल तिकीट आणि इतर महत्वाची कागदपत्रे आवश्यक असल्याचे बोलून दाखविले.व बोलता बोलता त्याचे अंतकरून भरून आले,लगेच आज दि ६ जानेवारी रोजी करन खंडाळकर हा त्याचे सहकारी मित्रांसोबत वडकी येथे गोपाल सांगानी यांचे निवास्थानी येऊन समक्ष कुटुंबासमोर भेटून त्यांचे धन्यवाद देत आभार मानले ह्यावेळी गोपाल सांगानी यांनी ते मिळालेले पाकीट आपल्या कुटुंबासमक्ष करणं ला सुपूर्द केले
गोपाल सांगानी यांनी मिळालेले पैशाचे पाकीट देऊन सर्वांसमोर वेगळा आदर्श मानला आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.