
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सतत पडणाऱ्या पावसाने नुकतीच उघड दिप दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सुरुवात केली असून सध्या शेतात सोयाबीन कापणीची लगबग दिसून येत आहे.
हवामानाचे फिरलेले उलटे चक्र आणि एलो मोजॉक या रोगाचा जबरदस्त प्रादुर्भाव झाला यामुळे सोयाबीन उत्पादकांचे कंबरडेच मोडले असून बाजारभाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक दुहेरी संकटात सापडला आहे.
अतिवृष्टीच्या पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यावर्षी सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये मोठी घट निर्माण होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत मजूरदार लावून सोयाबीन पिकाची कापणी करणे शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी नाईला जास्त हाती आलेले पिक जेमतेम पुन्हा पाण्यात जाऊ नये म्हणून शेतकरी लगबगिने सोयाबीन पिकाची मजूरदार वर्गाकडून कापणी करून घेत आहे.
दरवर्षी सोयाबीनचे कापूस पीक दसरा दिवाळीपूर्वी निघत होते त्यामुळे शेतकरी घरातील आपले निघालेले सोयाबीन कापूस पिक विकून दिवाळी साजरी करत असे दिवाळी अगदी दहा-बारा दिवसावर येऊन ठेपली असताना अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात कोणतीही पीक आले नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी या चिंतेत सध्या शेतकरी दिसून येत आहे.
शासनाने दिवाळीपर्यंत अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे सांगितले असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपर्यंत अतिवृष्टीची रक्कम जमा न झाल्यास दिवाळी सणापासून मुकावे लागेल असे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे
