
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे दिनांक 4/9/2023 रोज सोमवारला आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन सरपंच सौ.चंदाताई मधूकर पटोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ग्रामपंचायत सचिव पटाईत साहेब ,उपसरपंच प्रभाकर दांडेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, माजी उपसरपंच प्रफुल्ल तायवाडे, सदस्य संजय आत्राम,सौ.मालू कोटनाके,सौ.शालिनी तायवाडे, अभियंता काळेकर साहेब, योगेश वाघे आरोग्य सहाय्यक,अरूण गजणेर,तथा गावातील प्रतिष्ठित बाबाराव पटोरकर, नामदेव खोडे, पुरूषोत्तम नाखले,नाना टेकाम,भाष्कर गुरनुले तथा इतर मान्यवर उपस्थित होते.गावातील आरोग्य केंद्राचे भूमिपूजन झाल्याने गावात ताबडतोब आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
