
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कान्होली येथील माजी पोलीस पाटील तथा प्रतिष्ठित नागरीक ज्ञानेश्वरराव दादाजी हांडे पाटील यांचे दी. 29 ऑक्टो.रोजी रात्री 10.30 वा. निधन झाले.गेल्या काही दिवसापासून सेवाग्राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.मोक्षधाम कान्होली येथे 30 ऑक्टो. ला त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.
सामाजिक, राजकीय वर्तुळात त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांचे पच्छात पत्नी कमलाबाई व विजय, दिनेश, किरण ही तीन मुले ज्योती, आशा दोन मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.पत्रकार किरण हांडे यांचे ते वडील होते.
