
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पांढरकवडा : महाराष्ट्र राज्याचे
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर परिषद निवडणुकी निमित्त शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात पांढरकवडा येथे येत आहे. शिंदे यांची क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आज दि.२६ रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान जाहिर सभा आयोजीत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक प्रचारा निमित्त प्रथमच पांढरकवडा शहरात येत आहे. शिवसेनेच्या वतीने पांढरकवडा नगर परिषदेची निवडणुक स्वबळावर लढविण्यात येत आहे. सामाजीककार्यकर्ते सलीम खेतानी यांचा संपुर्ण गट शिवसेनेमध्ये दाखल झाल्याने शहरात शिवसेनेची ताकत वाढली आहे. पालकमंत्री संजय राठोड व सामाजीक कार्यकर्ते सलीम खेतानी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह संपुर्ण ११ प्रभागात २२ उमेदवार उभे करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना विजयी करण्याकरीता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतरुपी आर्शिवाद मागण्याकरीता पांढरकवडा येथे येत आहे. त्यांच्या जाहिर सभेची शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात येत आहे.
