भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने दिली टिप्परला धडक ; चालक जागीच ठार, दोन प्रवासी जखमी

प्रतिनिधी:सुमित चाटाळे, पांढरकवडा

पांढरकवडा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नागपूर कडून येणार्‍या ट्रॅव्हल्सने रोडवर उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली त्यामुळे चालक हा जागीच ठार झाला असून दोन प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे..

सदर घटनेची चौकशी ही पांढरकवडा पोलीस ठाणे अंतर्गत केली जात असून जखमी व्यक्तींना पांढरकवडा येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून ही ट्रॅव्हल्स उत्तरप्रदेशातून मजूर दुसर्‍या राज्यात पोहोचविण्यासाठी जात होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.