


कोरपना:अंशुल पोतनूरवार
भारत सरकारच्या विरोधी विधेयकाच्या विरोधात अनेक शेतकरी संघटना अनेक सामाजिक संघटनेने भारत बंदचे आवाहन करून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे संपूर्ण देशभर पडसाद उमटले. कोरपना शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमान पार्टी व इतर पक्षांनी संपूर्ण गावात घोषणा देत बंदला पाठिंबा दर्शवला. शेतकरी कायदा रद्द करा शेतकऱ्यांचे हीत जोपासा शेतकऱ्यावर जुल्मी कायदा लादू नका अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले त्यावेळी कोरपना व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी १००% बंदला पाठिंबा दर्शवून आपले प्रतिष्ठान बंद ठेवून समर्थन केले.
