शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून योग्य न्याय द्या :वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद ची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशात कृषी कायद्यांमुळे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी वर्गात संताप उसळला आहे.
मागील काही दिवसांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व पास केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा.

याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तर्फे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. पांढरकवडा येथील तहसील कार्यालय मार्फत सदर निवेदन सादर करण्यात आले, यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत करपते, सुमित चाटाळे तालुकाध्यक्ष, गोदावरी भंडारवार तालुका उपाध्यक्ष , शुभम वरगंटवार शहराध्यक्ष, वैभव सामृतवार तालुका सचिव, प्रणय मोहुर्ले ,ओम देशपांडे आदी उपस्थित होते..