हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारीै, गांजेगांव पुल रस्त्यांची दयनिय अवस्था नागरीकांची बेहाल…

परमेश्वर सुर्यवंशी ….प्रतिनिधी

तालुक्यातील हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारीै, , गांजेगांव पैनगंगा नदी पूल अंतर्गत रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली झाली असून या रस्त्यावरून वाहनधारकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या अंतर्गत रस्त्याची दुरूस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारि वाजपेई यांच्या कार्यकाळात माजी केंद्रीयमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या प्रयत्नातून आंध्र, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या वाशी ते सिरपलि विदर्भ संगम महत्वपूर्ण वाशी एकघरी, पार्डी, व्हाया हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, गांजेगांव, पैनगंगा नदी पूल या रस्त्याचा पंतप्रधान सडक योजनेत समावेश करुण मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. जवळपास दाहा वर्षाचा कालावधी उलटत गेला असून या अंतर्गत रस्त्या वर कोणी एक टोपलं मुरुमही टाकला नसल्याचे पळसपूरचे पञकार नागोराव शिंदे यांनी सांगितले.
सद्यस्थितीत या अंतर्गत रस्त्याची फार मोठी वाताहत झाल्याचे पहावयास मिळत आहे. गुडघ्या इतके खोल खड्डे पडले असल्याने नागरिकांना फार मोठा ञास सहन करावा लागत आहे. या मार्गावर छोटे छोटे अपघात घडतच आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणा मुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. या बाबीकडे हिंगोलीचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी बारा कि मि रसता मंजुर केला सर्वे झाला परंत आज प्रयत्नं कामास सुरवात झाली नसल्या ने तात्काळ लक्ष पुरवून सदरील रस्त्यांचे नवनीकरण करूण या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे