
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा
पांढरकवडा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया तर्फे धरणे आंदोलन करून मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वाखाली मा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी केळापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या आंदोलनातील प्रमुख मागण्या स्वातंत्र विदर्भ राज्य घोषित करा, अतिक्रमण धारक शेतकर्यांना जमिनीचे पट्टे वाटप करा, कोरोना काळातील वीज बिल माफ करा, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत करा, विदर्भात उत्पादनावर आधारित कारखाने सुरू करा, विदर्भात उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा याकरिता व्यवस्था करा, सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा..
या आंदोलनाला PBI राष्ट्रीय संयोजक आचार्य संतोषानंद अवधूत यांची उपस्थिती होती या आंदोलनात विदर्भवादी संघटनेचे मा. दिलीप भाऊ उमरे, मोरेश्वर वाटिले, अरुण कपिले, मारोतराव येवले, रामभाऊ गुल्हाने, राजू वीरदांडे, नरेंद्र धनरे, गजानन चव्हाण, गजानन राऊत, अमोल बाहेकर, प्रफुल राऊत, गोपाल नामपेल्लीवार, अशोक जयस्वाल, मोहन पवार, विभाश कोटनाके, पांडुरंग किरणापुरे, रामदास मांडवकर, शंकर गेडाम, देवू मडावी, भिमराव आत्राम, शिवा बावणे, मधुकर बोरकर, अशोक कुलसंगे, मारोती गिणगुले, देवू राठोड, अंकुश उईके आदींचा सहभाग होता..
