
प्रतिनिधी:,वरून त्रिवेदी, वरोरा
वरोरा:– उखार्डा गट ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी दिली
या बाबत अधिक बोलताना ते म्हणाले रंजीत कुडे यांच्या नेतृत्वात गट ग्रामपंचायत निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले . ७ पैकी ७ पण जागा लढविणार असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गावातील तरुणांची फळी व ज्येष्ठांचे मार्गदर्शन आमच्या सोबत असून या बळावर जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहे . गावाचा सर्वांगिन विकास व गावाचे गेलेले वैभव प्राप्त करून देण्यासाठी हि निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले
