भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन,शेखर पाटील व तातेराव वाकोडे यांच्या रस्सीखेच


प्रतिनिधी.. परमेश्वर सुर्यवंशी


हदगाव मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या हदगाव तालुका अध्यक्ष निवडीवरून विविध चर्चेना उधाण आलंय. नेमकी हदगाव भाजपा तालुकाध्यक्ष पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र अद्याप निश्चित नसले तरी या तालुकाध्यक्ष पदासाठी मात्र शेखर पाटील कोळीकर व तातेराव पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होताना दिसून येत आहे.

नुकतीच हदगाव शहरात देव उखळाई आश्रम येथे भारतीय जनता पार्टीकडून तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी हदगाव तालुक्याचे पालक सचिव शिवराज पाटील होटाळकर व मारोती वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी इच्छुक म्हणून शेखर पाटील, तातेराव पाटील, निळू पाटील, बापूसाहेब देशमुख, सचिन शिंदे आदी तालुक्यातील दिग्गज कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या. यावेळी या इच्छुकांनी आपापल्या समर्थकांचा आधार घेत व जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपणच कसे प्रबळ दावेदार आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. बैठकीच्या ठिकाणी निवघा बाजार,तळणी, कोळी, बामणी, तामसा, मनाठा, आदी परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्या करिता मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मात्र हे शक्ती हे शक्ती प्रदर्शन पाहता या ठिकाणी केवळ शेखर पाटील कोळीकर व तातेराव पाटील यांच्यातच खरी रस्सीखेच असल्याचे दिसून आले.
बैठकीस उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनमधुन बहुतांश भाजपा कार्यकर्ते हे चंद्रशेखर पाटील कोळीकर यांच्या समर्थनार्थ उपस्थित असल्याचे दिसून आले. एकंदरीत भाजपा हदगाव तालुका अध्यक्ष पदी चंद्रशेखर पाटील यांची वर्णी लागणार आसल्याची जोरदार चर्चा भाजप कार्यकर्ते करत होते.

सदरील बैठकीचा अहवाल जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, खा.प्रताप पाटील चिखलीकर व आ. राम पाटील रातोळीकर यांच्याकडे सादर केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हा भाजपा नेमका काय निर्णय घेणार आणि कुणाच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडणार याकडेचं सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी भाजपा हदगावचे जेष्ठ नेते ॲड. पंडितराव देशमुख, ॲड उत्तमराव टिकोरे, ॲड भगवानराव कदम,प्रकश घुन्नर, माधवराव देवसरकर व पक्षाचे सर्व पदाधिकारी,बुथ प्रमुख, क्रियाशील सदस्य व सक्रिय सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.