देवघाट नाल्याजवळ टँकरचा अपघात ,चालक गंभीर

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना

कोरपना-
चंद्रपूर आदिलाबाद महामार्गावर, कोरपना तालुक्यातील देवघाट नाल्याजवळ रात्री नउ वाजताच्या सुमारास गाडी क्र T S 01 UC 1865 चा रोडवर तीन पलट्या होवून अपघात झाला व गाडीच्या कॅबिनचा चेंदामेंदा झाला मात्र ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली . सदर अपघात विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनाने कट मारल्यामुळे चालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक ने तिन पलटी झाल्याचे चालकाने सांगीतले. सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन ला मिळतास ठाणेदार गुरनुले यांच्या मार्गदर्शनात श्री प्रकाश राठोड स .पो .नी याच्या नेतृत्व पो शी गजानन पो शी संजय कोडापे पथकाने घटनास्थळ गाठून जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आनले . महामार्गावर गेल्या एक वर्षापासून बनविण्याचे काम सुरु आहे मात्र रोडवरील खड्डे कमी होत नाही त्यामुळे वारंवार अपघात होत आहे अपघातग्रस्त ट्रक महामार्गावर पडून असुन वाहतूकीस अडचण निर्माण झाली असुन अपघात वळनावर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही घटनेचा पुढील तपास कोरपना पोलिस करीत आहे.