

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर
आज सावित्री बाई फुले जयंती ठिकठिकाणी उत्साहाने साजरी करण्यात आली, केळापूर तालुक्यात अनेक गावामध्ये जयंती ही उत्साहात साजरी केली जाते.
पांढरकवडा येथे देखील सावित्री बाई फुले चौक
येथे सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी तालुक्यातील अनेक समाज संघटना व पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी नियोजित कार्यक्रमात अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यासारख्या अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली..
