उद्या राज्यपाल कोश्यारी ताडोब्यात होणार दाखल.

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

चंद्रपुर : भारताचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज पासून ते 17 जानेवारी या कालावधीत विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. 13 ते 15 जानेवारी असे तीन दिवस अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामास राहणार आहेत.

आज 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता नागपूर विमानतळावरून दाखल होतील. यानंतर राजभवनात विश्रांति करतील. दुसर्‍या दिवशी 13 जानेवारी रोजी वरोराच्या दिशेने प्रस्थान करतील. 15 जानेवारीपर्यंत ते ताडोब्यात मुक्काम करतील. दुपारी 12 वाजता वरोराहून नागपूरकडे प्रस्थान करतील. राज्यपाल कोश्यारी यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.