
चंद्रपुर: बिंग डिझायनर बहुउद्देशीय संस्था व पंप अप डान्स अकॅडमी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकल नृत्य स्पर्धा ‘डान्स रिलोड’ आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा दोन गटात असून 8 ते 15 व 16 ते 25 अश्या दोन वयोगटात ठेवण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे ऑडिशन 20 व 21 जानेवारी रोजी ‘पंप डान्स अकॅडमी’ रघुवंशी कॉम्प्लेक्स, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे, तरी या स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकांना हमखास बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तरी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन अक्षय डाकरे यांनी केले आहे.
सहभाग घेण्यकरिता दत्तात्रय पुरोहित 8421244421 व राकेश सयाम 7387559295 यांच्या कडे संपर्क साधावा.
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर
