.

प्रतिनिधी:जीवन तोगरे, जिवती
आम आदमी पार्टीने चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निवडणुका लढवायचे ठरविले असल्याच्या अनुषंगाने येणा-या नगरपंचायत ,पंचायत समीती ,जिल्हा परीषदा ग्रामपंचायत निवडनुकीचे ऊद्दीष्टे समोर ठेऊन वाटचाल सुरु केली आहे. आम आदमी पार्टी चे दिल्लीचे माॅडेल जनतेसमोर ठेवण्यात येत आहे .त्यामुळे जनतेकडून उस्फूर्त प्रतीसाद मिळत आहे त्यामुळे आप चे संघटन मजबूत करण्याकरीता जिल्हा कमेटी तालुका कमेटी अथक प्रयत्न करीत आहे .
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री. सुनिल देवराव मुसळे, जिल्हा सचिव श्री. संतोष दोरखंडे , जिल्हा कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी , राजुरा विधानसभा प्रमुख श्री. प्रदिप बोबडे , तसेच RTI पदाधिकारी श्री.सुर्यकांत चांदेकर , जिवती तालुका अध्यक्ष श्री.मारूती पुरी, सचिव श्री. गोविंद गोरे, उपाध्यक्ष श्री. सुनील राठोड, श्री. हरिचंद्र जाधव युवाध्यक्ष श्री. अक्षय शेळके, युवाउपाध्यक्ष श्री. बालाजी मस्के, श्री. श्रीराम सानप तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
