
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर
वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, विवेकानंद वॉर्ड बल्लारपूर.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. शहराचे वाढते तापमान ही एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संगोपन करुन त्याची जबाबदारी घेतली पाहिजे.वृक्षारोपण शास्त्र, कला की समाजसेवा हा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो, तेव्हा बहुतेक वेळा याचे उत्तर समाजसेवा असेच मिळते. अनेक ठिकाणी हा उरकून टाकण्याचा कार्यक्रम असतो, म्हणूनच या गोष्टी समजून घेत विवेकानंद वॉर्ड, बल्लारपूर येथील जेष्ठगण, स्त्रिया व युवकगण हा कार्यक्रम २६ जानेवारी निमित्ताने पार पाडला.
