
साकोली/भंडारा
२२ जाने.
तालुका प्रतिनिधी
आजच्या या संगणक युगामध्ये जग इतकं पुढे चाललयं कि आपण काही गोष्टींचा तर अंदाजा देखील लावू शकत नाही महत्वाचे म्हणजे जगाबरोबरचं लोकांची बोलीभाषा सुद्धा बदलत चालली आहे.
चक्क शहरातचं नव्हें तर आता खेडोपाडी सुद्धा हिंदी व इंग्रजी भाषेचा प्रभाव थोडेफार का होईना मात्र जाणवतोय हे मात्र खरं !
“आपल्याला जगानुसार बदलायला हवं, कारण हिंदी व इंग्रजी भाषेत व्यवहार करणे म्हणजे मराठी भाषेची विटंबना करणे नव्हे तर हे एक साक्षरतेचे लक्षण आहे; मात्र आपल्याला आपली मातृभाषा मराठी ला विसरता कामा नये कारण आपल्याला आपल्या मातृभाषेचे रक्षण करणे हे काळाची गरज आहे.”
“अशा या परिस्थितीत दि. १४ जाने. ते २८ जाने. मध्ये राज्यात साजरी होत असलेल्या “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हा ! आणि भविष्यात मराठी भाषेची जोपासना करा”
असे श्री राम सेना सामाजिक संघटना साकोली चे विद्यार्थी तालुकाध्यक्ष सचिन सोनवाने यांनी शासकिय तंत्रनिकेतन साकोली या संस्थेमध्ये एका आॅनलाईन गुगल मीटद्वारे समस्त तालुका वासीयांना आवाहन केले आहे.
