व्हॅलेंटाईन स्पेशल: प्रियकारासाठी अल्पवयीन प्रेयसी बनली चोर. चोरीच्या पैशातून घेतला कॅमेरा!

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

चंद्रपुर : येथील गंज वार्डात असलेल्या सदनिकेत वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलगी प्रियकारासाठी चक्क चोर बनली. चोरीचे दागिने शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीत गहाण ठेवून तब्बल दीड लाख रुपये उचलले.

अल्पवयीन मुलीचे तुकुम परिसरातील एका युवकावर प्रेम जळले. अल्पवयीन मुलगी दहावी नापास आहे. त्यामुळे तिने दहावी पास होऊन पुढील शिक्षण घेण्याची इच्छा प्रियकराकडे व्यक्त केली. त्यानंतर प्रियकाराने प्रेयसीला दहावी पास करण्यासाठी मित्रांकडे प्रस्ताव मांडला. प्रियकराच्या एका मित्राने दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतील असे सांगितले. दोघांनीही या कामासाठी पैसे जमवण्याचा निर्णय घेतला. प्रेयसीची सदनिके जवळील घरा शेजारी चांगली ओळख होती. या ओळखीतून तिची घरी ये-जा असायची. त्या कुटुंबातील सदस्य गच्चीवर गेले असता मुलीने सोन्याच्या दागिन्यांचा तपास केला.

काही वेळानंतर चोरीची घटना उघडकीस आली. संबंधित कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
चोरी करण्यात आलेले दागिने मुलीने प्रियकराला दिले असता त्याने एमबीए चे शिक्षण घेणाऱ्या एका मित्राच्या मदतीने काही दागिने एका खासगी फायनान्स कंपनीत गहाण ठेवले. त्या बदल्यात दीड लाख रुपये घेतले. उर्वरित दागिने घरी लपवून ठेवले. मिळालेल्या पैशातून प्रियकराने कॅमेरा खरेदी केला.

स्थानिक गुन्हा शाखेचे पथक मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा मागे होते. तुकुम परिसरातील एका युवकाकडे चोरीचे दागिने असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर 12 वीचे शिक्षण घेणाऱ्या तुकुम परिसरातील युवकाचे नाव समोर आले असता सर्व घटनेची कबुली पोलिसांना दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. चोरीचे सोने गहाण ठेवण्यासाठी मदत केलेल्या मित्राला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 3 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.