
लता फाळके/ हदगाव
हदगाव विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष विश्वजीत अडकिने यांचा खैरगाव – कामारी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. विश्वजीत अडकिने यांच्या निधनामुळे हदगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील बहीण पत्नी व दोन मुले असा मोठा परिवार आहे
