सतत विजेच्या लपंडावामुळे ऊंचाडकर हैराण:अरुण पाटील

लता फाळके /हदगाव

सध्या संबध महाराष्ट्र कोरोना महामारीमुळे त्रस्त असतांना
तालुक्यातील मौ.ऊंचाडा येथील ग्रामस्थांना एका वेगळ्याच समस्येला सामोरे जाव लागत असल्याचे ग्रामसथांतुन बोलले जात आहे ऊंचाडा येथील लाईट गेल्या पंधरवड्यापासून दिवसातून आठ ते दहा वेळा तशीच रात्रीला तिन चार वेळा जात असून दिवसा वीज गेल्यास 1 ते 3 तास तर रात्रीला गेल्यास त्यापेक्षाही जास्त वेळ बत्ती गुल होत आहे तर मागील चार दिवसापासून चक्क अख्खी रात्र ऊंचाडावाशिंयाना आंधारात काढावी लागल्याने ग्रामस्थांना भर उन्हाळ्याच्या उकाडयात विद्युत विभागाच्या या हलगर्जीपणामुळे नर्कयातना भोगाव्या लागत असल्याने वीज वितरण कंपनी विरोधात स्थानिक ग्रामस्थांतुन कडक उद्रेक ऐकाव्यास मिळत आहे वीज गेल्यावर नागरिक विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून बेजार होत आहेत तरी नागरिकांचा फोन कोणताही अधिकारी वा कर्मचारी उचलत नाहीत अशातच नागरिकांकडे असलेले वीजबिल वसुली करीता अधिकारी मात्र तगादा लावत आसतात विज बिल न भरल्यास संबंधित विजग्राहकांची लाईट ताबडतोब कट करण्यात येते ऊंचाडा व परिसरात सध्या विद्युत कंपनीचा मनमानी कारभार चालत असल्याने सामान्य जनता मात्र त्यांच्या या हेकेखोरीला चांगलीच कंटाळली आहे.
संध्या ऊंचाडा व परिसरात विद्युत वितरण कंपनीचा नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मुक्का मार सुरू असल्याचे ग्रामस्थांतुन बोल्याजात आहे त्यामुळे नागरिकांच्या या असंतोषाचा भडका कधीही उडू शकतो याकडे वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही नागरिकांतुन बोलले जात आहे? परिसरात सध्या अघोषीत लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रात्रीला आणि दिवसा सुद्धा अनेकदा विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे नागरिक दिवसा कसेबसे राहू शकतात परंतु रात्र काढणे मात्र कठीण झालेले आहे रात्रीला लाईट गेल्यास मच्छरांच्या त्रासामुळे लहान मुले व वयोवृध्दांना मलेरिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोरोनामुळे अगोदरच ग्रामस्थ धास्तावले असतांना आत्ता मलेरीया ही बिमारी तोंड वर काढते की काय ❓ याची काळजी स्थानिक ग्रामस्थांना लागली आहे भयंकर गर्मी मुळे नागरिक हैराण झालेले आहेत त्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीत रात्र काढावी लागत आहे याबाबत अधिकाऱ्यांना नागरिकांनी फोन केला असता कोणताही अधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे जनता चांगली त्रस्त झाली आहे उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही लोडशेडिंग नसताना परिसरातच वीज कंपनीची अरे रावी का ? याचे उत्तर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच देऊन वेळीच हे अघोषित लोडशेडिंग बंद करावे अन्यथा गावातिल तरुणांचा वीज वितरण कंपनी विरुद्ध असंतोषाचा भडका कधीही उडू शकतो हि बाब विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावी असे नागरिकांतुन बोलल्या जात आहे

चौकट
मागिल पंधरवाड्यापासुन गावात विजेचा रात्रंदिवस लपंडाव चालु आहे सध्या संबध महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव चालु असल्याने अगोदरच ग्रामस्थ चिंतेत असतांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रात्री लाईट नसल्याने गावातिल बरीच वृध्द मंडळीना प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत आहे तर काहींना गर्मीमुळे श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊन त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही वेळीच विज वितरण कंपनींने या जीवघेण्या समस्येचे निवारण न केल्यास गावात एखादी जीवघेणी घटना घडल्यास विज वितरण कंपनी विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करु.
अरुण पाटील ऊंचाडाकर
ग्रामस्थ