सत्ता असो वा नसो मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार- मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर

लता फाळके /हदगाव



मा. आमदार नागेश पाटिल आष्टीकर यानी मागील वर्षी त्यांच्या आमदारकी च्या कार्यकाळात मतदार संघात खूप विकास कामे केली. परंतू काही कामे ही अर्धवट राहिली होती त्यात अंदाजे 55 ते साठ लंक्ष रु. कोळी या गावांत मंजूर केले होते हे कामे काही विघ्नसंतोषी लोकांच्या आडमुठे धोरणामुळे बर्‍याच दिवसापासून थांबले होते. यामुळे कोळी येथील नागरिकांनी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेऊन त्यांना गावातील समस्या सांगितल्या. त्यामुळे मा.आ. नागेश पाटिल आष्टीकर यानी स्वत: लक्ष देवून या कामांना सुरवात करण्याचे व कामे तातडीने करण्यासाठी संबंधितांना सुचना देउन स्वतः त्या कामावर हजेरि लावुन कामाची पाहणी केली व होणाऱ्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यावेळी बोलतांना नागेश पाटील यांनी सांगितले की, सत्ता येईल – जाईल पण मी कधीही मतदार संघातील जनते सोबत दुजाभाव करणार नाही व उर्वरित कामे लवकरात लवकर पुर्ण होतील असे आश्‍वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानराव शिंदे, खरेदी विक्री संघ तालुका उपाध्यक्ष विनायकराव कदम, राजेंद्र जाधव तळणीकर, बाळु पाटील निवघेकर, संदिप पाटिल, अवधूत देवसरकर, आशिष भुजबळ, प्रविन जगताप, अक्षय धांडे, माजी सरपंच गणेशराव चौतमल, पपु चौतमल, नामदेव चौतमल, संतोश क्षीरसागर व गावातील मंडळी उपस्थित होती.