कोरोना चा कहर कमी करण्यासाठी माजी आमदार नागेश पाटील यांचे शर्थीचे प्रयत्न

प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव

संपूर्ण जगभर कोरोना ने थैमान घातले आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव- हिमायतनगर मतदार संघात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जनता भयभीत झाली आहे कोरोना या संसर्गजन्य आजार च्या भितीमुळे लोक स्वतःच्या नातेवाईकाला सुद्धा दवाखान्यात भेटण्यासाठी जायला घाबरत आहेत अशा परिस्थितीत हदगाव- हिमायतनगर मतदार संघाचे शिवसेनेचे लोकप्रिय माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदारसंघातून कोरोना घालविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. नागेश पाटील यांनी स्वतः शिवसैनिकांना सोबत घेऊन सरकारी दवाखाने,कोव्हीड
सेंटर येथे भेटी दिल्या तसेच त्यांना काय हवे-नको ते बघून सहकार्य केले तसेच रुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांना धीर दिला आष्टीकर साहेबांनी धीर दिल्यामुळे खूप बरे वाटले अशा अनेक रुग्णांनी प्रतिक्रिया दिल्या. मागच्या वर्षी सुद्धा नागेश पाटलांनी सरकारी दवाखाना तसेच कोव्हीड सेंटरला भेट देऊन सहकार्य केले होते. आतासुद्धा कोरोनाचि दुसरी लाट सुरू असताना नागेश पाटील आष्टीकर यांनी दोन वेळा दवाखाना तसेच कोव्हीड
सेंटरला भेटी दिल्या. कोरोना कमी होत नसल्यामुळे खूप बिकट परिस्थिती आहे आहे तरीपण दिनांक 19 ते 29 असे दहा दिवस सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे अशी सर्व व्यापारयांना विनंती केली. आज स्वतः माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी मोटरसायकलवर हदगाव शहरामध्ये पूर्ण फेरी मारून प्रत्येक दुकानदाराला दुकाने बंद ठेवण्यासाठी विनंती करून सर्व दुकाने बंद करायला सांगितले या काळात कुणी बाहेर निघायला तयार नसताना मात्र माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर स्वतः मोटर सायकलवर फिरून दुकाने बंद ठेवून कोरोना ची
साखळी तोडण्यासाठी प्रयत्न आणि सहकार्य करायला विनंती करीत होते हे बघून हदगाव तालुक्यातील जनतेला आपल्या सोबत कोणीतरी आहे त्यामुळे खूप धीर मिळाला सत्ता असेल नसेल पण मी नेहमीच जनतेसोबत असेन असे कृतीतून हदगाव च्या नागरिकांना पहावयास मिळाले.
माजी आमदार नागेश पाटील यांचे कोरोना साखळी तोडण्याच्या साठी चे शर्थीचे प्रयत्न करताना पाहून जनता सुखावली.