निवघा ग्रामपंचायतने रोखला बालविवाह

लता फाळके / हदगाव

तालुक्यातील निवघा(बा.) येथे एका समाजाच्या मुलीचा विवाह ठरला, परंतू त्या मुलीचं लग्नाच वय अवघे १३ वर्ष होते लग्नाचे वय झाले नसल्याने एका समाजसेवकाने ही बाब जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी कळविले त्यानुसार निवघा ग्रामपंचायत ला तहसिल कार्यालयाने कळविल्याने ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यानी हा बालविवाह समजुतदाराने रद्द केल्याने सर्वत्र ग्रामपंचायतचे कौतूक होत आहे..
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवघा येथे ता.२ मे रोजी एक बालविवाह संपन्न होणार होता.पंरतू समाजात काही पडद्याआड काम करणारे समाजसेवक असतात त्या समाजसेवकानी ही घटना जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी स्वरूपात कळविली. जिल्हाधिकारी यानी तहसिलदार हदगांव याना लेखी पत्र देऊन ग्रामपंचायत ला कळविली की, ता.२ मे रोजी होणारा बालविवाह रद्द करण्यात यावा अन्यथा लग्न करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यानी व व्यापारी मधूकर कदम यानी सदरील मुलीच्या वडीलाना व नातेवाईकाना अल्पवयीन मुलीच्या पालकांना जाऊन भेटले व त्यांना विश्वासात घेऊन सध्याच्या काळात अशा प्रकारे बालविवाह करणे अतिशय चुकीचे असून मुलीला अजून शिकवण्याची व तिला समंजसपणा येऊ देण्याची विनंती केली. व त्यांनी ताबडतोब आपल्या मुलीचा होणारा बालविवाह न करण्याचे मान्य केले. यावेळी सरपंच शरद कदम, उपसरपंच श्याम कदम, ग्रामसेवक दिपक झरकर, मंडळाधिकारी कोल्हे मॅडम, मधुकर कदम, शिवाजी देशमुख, अमोल कदम, इत्यादी उपस्थित होते. मधुकर कदम यांनी पुढाकार घेवून समाजात एक नवा पायंडा पाडला म्हणुन त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
खरचं आज आपल्या जिजाऊ,सावित्री रमाई च्या लेकींचा अशा प्रकारे बालविवाह करणे अतिशय चुकीचे व अक्षम्य अपराध आहे.
पण अजूनही आपल्या ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे बालविवाह लावला जात असतो. अशावेळी समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकांनी त्या परिवाराला समजावून सांगून असे बालविवाह थांबविले पाहिजेत.