हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग उभे करण्याचा मानस- खा. हेमंत पाटील

लता फाळके/ हदगाव

हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी जिल्ह्यात नव नवीन उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

हिंगोली जिल्हा हा उद्योगधंदे नसलेला जिल्हा समजला जातो. पण मी हळद संशोधन बोर्डाच्या माध्यमातून ही ओळख काही प्रमापणात कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे ही विविध उद्योग हिंगोली जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहील त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सदन दिल्ली येथे तैवानच्या शिष्ट मंडळाने भारतात उद्योग स्थापने संदर्भात चर्चा केली त्यावेळी खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांना उद्योग स्थापनेसाठी आमंत्रण देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लवकरच हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न राहील असेही खा. हेमंत पाटील यांनी सांगितले.