

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
वरोरा शहरातील एका नवीन तयार झालेल्या नगरी मध्ये काल एका अल्पवयीन प्रेयसीच्या नादात दोन गट आमनेसामने आले .या दोन्ही गटात आधी बाचाबाची झाली बाचाबाची चे रूपांतर उग्र होत एकमेकांवर वार करण्यात आले .या मध्ये एका मुलाला पोटावर,एकाला हातावर व एका मुलाला चेहऱ्यावर ब्लेड ने वार करण्यात आला.यातील एका गटाकडे सतुर होता व एका गटाकडे ब्लेड असल्याची माहिती आहे.
हि अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकर घोडपेठ व टेमुर्डा येथील असल्याचे कळते .व्हॅलेन्टाईन डे सुरू असल्याने प्रियकर व प्रेयसीचे सुगीचे दिवस आहेत त्यातच त्या मुलीचा आणखी एक प्रियकर असल्याने दोन प्रियकरांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.ही अल्पवयीन प्रेयसी बोर्डा भागातील असल्याची देखील चर्चा ऐकावयास मिळत आहे .या प्रकरणी कोणताही गुन्हा वरोरा पोलीस ठाण्यात दाखल झाला नसल्याचे कळते.
