
लता फाळके / हदगाव
हदगाव तालूक्यातील कोथळा येथील शेतकरी यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा पांदणरस्त्याचा प्रश्र्न समन्वयाने मार्गी लावून दोन ते अडीच किलोमीटर चा रस्ता खुला केल्याबद्दल स्नेहलता स्वामी नायब तहसीलदार हदगाव यांचे आभार मानले.आज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीसाठी स्वामी मॅडम आल्याचे कळताच निवड संपल्यानंतर सर्व शेतकरी बांधव एकत्र आले व त्यांनी मोकळा केलेला पांदणरस्ता आज पुन्हा एकदा पाहण्याची त्यांना विनंती केली..आज त्या रस्त्यावरून सर्व शेतकरी यांचा ऊस व अन्य पिकांचे उत्पादन घरापर्यंत विनात्रास येत असल्याचे सांगत आभार मानले.अनेक वेळा अर्ज करून शेवटी उपोषणाला बसेपर्यंत ही प्रशासन शेतकरी यांच्या पांदणरस्त्याची दखल घेत नव्हते त्यावेळी हदगाव येथे नव्यानेच रूजू झालेल्या शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या स्वामी यांनी शेतकऱ्यांचे उपोषण सोडविले व दुसरेच दिवशी येऊन अडलेलाच नव्हे तर संपूर्ण लिंबगव्हाण पर्यंतचा दोन किलोमीटर रस्ता आपुलकीने व समन्वयाने सोडविला होता. शेतकरी यांचे विनंती वरून स्नेहलता स्वामी यांनी आज त्या पांदणरस्त्यास शेतकरी बांधवांसह दुपारी ३ वा. भेट दिली. गावकरी शेतकरी बांधवांनी दिलेल्या प्रेमाने त्या भारावून गेल्या.सदहेतू ठेऊन कर्तव्यबुद्धीने केलेल्या कामाची हीच खरी पोच पावती असल्याचे त्यांनी याप्रंसगी सांगितले.यावेळी माजी सरपंच बाबुराव शिंदे, संजय शिंदे, तलाठी वडकुते,ग्रामसेविका सत्वशिला मोरे यांचेसह नवनिर्वाचित सरपंच वर्षा सुर्यवंशी, उपसरपंच रत्नकला वानखेडे ,माधव नरवाडे,विनोद शिंदे, शिवाजीराव वानखेडेसह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
