पदावली भजनाच्या गजरात धोपटाळा येथे युवकांनी केली शिवजयंती उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना

       दि. १९/०२/२०२१ रोजी धोपटाळा या कोरपना तालुक्यातील छोट्याशा गावात  छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या आनंदाच्या क्षणी सर्व ग्रामवासी उपस्थित राहून प्रथम गावातून पदावली भजनासह रॅली काढण्यात आली. त्यानंतर श्री हनुमान मंदिर चौक धोपटाळा येथे महाराजांच्या  फोटोला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

धोपटाळ्यात सार्वजनिक रित्या पहिल्यांदाच घेण्यात आला होता हा प्रथमच सार्वजनिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सर्व ग्रामवासीयांनी सक्रिय असा सहभाग घेत युवकांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमा दरम्यान गावातील होतकरू तरुणांनी महाराजांच्या जिवनावर, विचारांवर प्रकाश टाकला तसेच या पुढे यशाचं प्रकारचे कार्यक्रम घेऊन गावात सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी प्रयत्न केले.