अपघात:विजेच्या धक्क्याने कामगाराचा खांबावरच मृत्यू

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा


बोर्डा गावातील विकास नगर भागातील विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती चे काम करताना विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू झाला .मृतकाचे नाव राजू काशीनाथ भोयर असून रा. मालेवाडा, चिमूर येथील रहिवासी असून वय 28 ते 30 च्या दरम्यान होते.मृतक हा सध्या फुकट नगर येथे राहत होता,हा मृतक नागपूर येथील एका विद्युत कंत्राटदार कडे काम करत होता. दुर्घटनेनंतर शव विच्छेदनासाठी शव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.