

वरोरा तालुक्यातील वनोजा येथील रहिवासी दत्तराज शंकर उताणे यांचे चिकणी शिवारात असलेल्या शेतातील गोठ्यात 8 क्विंटल गोळा केलेला कापूस ठेवून
होता.त्या कापसावर शेतात कोणीच नसल्याचे पाहत रात्री 8 वाजताच्या दरम्यान दोन युवकांनी येत .दुचाकी बाहेर ठेवली कापसावर डल्ला मारत कापूस चोरी करत असताना गावातील तरुण आशिष येळेकर याला शेतात हालचाल जाणवली .त्यांनी शेत मालक दत्तराज शंकर उताणे यांना कॉल करून संपर्क केला.त्यांनंतर त्यांनी जावई योगेश बोभाटे यांना शेतात जाऊन पाहण्यासाठी सांगितले .सकाळी शेतातील गोठ्यात जाऊन पाहले असता शेतातील कापूस 2.5 क्विंटल कमी असल्याचे लक्षात आले . वानोजा येथील शेतकरी दत्ताराज शंकर उताणे यांची 5 एकर शेती दीड वर्षा पासून चिकणी शेतशिवारात असून ते आपली शेती वानोजा या गावावरून बघतात गेल्या काही दिवसापासून त्यांचा शेतात कापसाची शेवटची वेचणी चालू आहे दिनांक 22 ला त्यांनी दिवसभर मंजूराच्या हातानी कापूस वेचला आणी नेहमी प्रमाणे आपले कापसाचे गाठोळे टींनच्या कोट्यात ठेऊन आपल्या गावी गेले असता त्याचीच संधी साधून गावठी चोरांनी रात्री 8 च्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना गावातील नागरिकांना त्यांच्या गोट्या कडे गाडीचा लाईट दिसला गावातील नागरिकांनी दत्ताराज उताणे यांना फोन लावून विचारले असता मी शेताकडे आलो नाही असे सांगण्यात आले त्याच गोष्टीचा गावकाऱ्यांना संशय आला असता गावकरी शेताकडे गेले असता चोरट्यांनी आपली गाडी Mh.34 AS 6648 गाडी ठेवून घटना स्थळावरून पळ काढला गावाकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता ते सापडले नाही गाडीच्या नंबर वरून चोरांना दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक करून जेरबंद केले. जवळपास 2 क्विंटल 50 kg कापूस अंदाजे 25000 किमती चा कापूस चोरीला गेल्या असल्याची माहिती दिली. पोलिसांनी चोरट्याना अटक केली आहे समोरील तपास वरोरा पोलीस करत आहे त्यानुसार वरोरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
