युवा कार्यकर्ते आदित्य राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र रोग निदान शिबीर संपन्न

हिमायतनगर प्रतिनिधी: तालुक्यातील कोठा तांडा येथील युवा कार्यकर्ते तथा उपसरपंच प्रतिनिधी आदित्य संतोष राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅम्पुटर द्वारे मोफत नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिरासाठी डॉक्टर सुधाकर संभाजीराव तहाडे विशेष नेत्ररोग व नेत्र शल्य चिकित्सक मुंबई यांनी उपचार दिला व हिमायत नगर येथील ओम कार यांच्याकडून अल्पदरात नागरिकांना चष्मे देण्यात आले यासह येथील शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या पेन व फळांचे वाटप व खेळाडूंना हॉलीबॉल नेट किट देऊन सामाजिक उपक्रम राबवत युवा कार्यकर्ते आदित्य राठोड यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला
हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा ही मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाते या ग्रामपंचायतीमध्ये मागील काळात झालेल्या निवडणुकीमध्ये आदित्य संतोष राठोड यांनी यांच्या पॅनल कडून नऊच्या नऊ सीटा भरघोष मतांनी निवडून आणल्या होत्या त्यामुळे त्या ग्रामपंचायत वर आदित्य राठोड यांचे एक हाती वर्चस्व असल्या मुळे येथील नागरिकांनी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी कॅम्पुटर द्वारे मोफत नेत्र रोग निदान शिबीर व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळ वाटपाचा कार्यक्रम राबवित त्यांचा वाढदिवस कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत साजरा केला
या नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन रोहन राठोड प्रमोद राठोड, आदित्य संतोष राठोड , यांनी केले होते यावेळी या कार्यक्रमास कोठा तांडा, कोठा वाडी सह कोठा ज येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते