पिक विमा न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करणार

लता फाळके /हदगाव


हदगाव तालुक्यासह नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने सोयाबीनचा अक्षरशः चिखल झाला होता,याला चिंचगव्हाण हे गावही अपवाद नाही,परंतु विमा कंपनीचा चाल ढकलपणा,व महसुल व कृषी विभागासह आमदार ,खासदारांच्या नाकर्तेपणामुळे हदगाव तालुक्यातील बहुतांश गावे पिक विम्याला मुकले आहेत.
एकीकडे सरकार अतिवृष्ठीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे अनुदान वाटप करीत आहे,तर दुसरीकडे विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानच झाले नाही म्हणत पिक विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.मग अतिवृष्टी झालीच नाही तर सरकारने अनुदान का दिले ? व झालीच तर विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा मंजुर का करीत नाही ? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
चिंचगव्हाण येथील बालाजी घडबळे,व वर्षा बालाजी घडबळे यांनी तहसिलदार हदगाव,जिल्हाधिकारी नांदेड ,इफको टोकीओ विमा कंपनी ,मुख्यमंत्री यांना हदगावच्या तहसिलदारांमार्फत दुसऱ्यांदा निवेदन देऊन कळविले की,15 दिवसात विमा न मिळाल्यास आम्ही परीवारासह शेतामध्येच आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन करुन कळविले आहे.आता संबंधित विमा कंपनी व प्रशासकीय स्तरावरुन काय कार्यवाही याची सदर कुटुंब वाट पाहत आहे.

चौकट
मी पिक विमा कंपनीला तक्रार करुन पंचनाम्यासाठी अर्ज केला.कंपनीच्या हलगर्जी बाबत या अगोदर आत्मदहनाचा इशारा दिला होता तरीही,तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीला पत्र देऊनही कारवाही केली नाही त्यामुळे आलेल्या नैराशामुळे आम्ही पंधरा दिवसानंतर सह कुटुंब आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे
सौ.वर्षा बालाजी घडबळे शेतकरी चिंचगव्हाण ता,हदगाव.