
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव
आज दि १२ रोजी तुषार देशमुख यांनी शिष्टमंडळासह राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची पुणे येथे मध्यवर्ती ईमारत आयुक्त कार्यालय येथे विविध मागण्यासंदर्भात चर्चा केली, यावेळी अनेक दिवसांपासून राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदामुळे गुणवत्ता पुर्ण अभियोग्यता धारक युवक नैराश्याकडे वळतायेत अधिवेशन काळात राज्यशासनाने ६१०० पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ करण्यासाठी आदेश दिले त्यामुळे आता मागील खुप अडथळ्यांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती, आताही तिच पुनरावृत्ती होऊ नये, कारण दुसरे दुहेरी संकट म्हणजे, या रिक्त पदामुळे सुशिक्षित युवकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालय शिवाय, जिल्हा परिषद व खाजगी संस्थेत शिक्षण घेणार्या राज्यातील सर्वसामान्यांच्या मुलांच शैक्षणिक भवितव्य देखील चितेंचा विषय ठरतोय त्यामुळे ह्या भरती प्रक्रियेस विलंब न लावता ति लवकर पुर्णत्वास नेण्यात यावी व उर्वरित मोठ्या प्रमाणात असलेले रिक्त पदांची जाहीरात काढण्यात यावी, अशी मागणी, केली व
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्या संसदरत्न मा खा सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन सादर केल्या
यावेळी विजय भणगे, सारंग सर, मोहम्मद जफर ,राहुल पुंड, शिक्षक परिषदेचे, संदीप शिर्के अंकुश भोईर, प्रमोद देसले विलास वायकर मेघना म्हात्रे, अश्विनी, आदी उपस्थित होते.
