

चंद्रपूर -नागपूर रोड वर नेहमीच वर्दळ असते.बरेचदा दुरून जाण्याचं टाळण्यासाठी नागरिक विरुद्ध दिशेने गाडी चालवत येत असतात.अशीच घटना बोर्डा चौक जवळ नेताजी हायस्कूल जवळ झाला.दुचाकीस्वार हा विरुद्ध दिशेने येत असताना बोर्डा चौक येथून भद्रावती कडे जाण्यासाठी उभी असणारी काळीपिवळी गाडीच्या चालकांने अचानक दार उघडल्याने दुचाकीस्वाराची गाडी धडकली व तो खाली पडला व जवळून जाणाऱ्या बस च्या मागच्या चाकामध्ये आल्याने घटनास्थळी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला मृत इसमाचे नाव रोहन उर्फ जॅकी माटे वय 24 व्होल्टाज सागर कॉलनी वरोरा येथील रहिवासी आहे .MH40 AQ 6420 हा त्या बस चा क्रमांक असून ही बस नागपूर आगराची आहे.तर काळीपिवळी चा क्र.MH34 2518 असा चालकाने प्रतिनिधी ना माहिती दिली.
