
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी ,वरोरा
मराठा सेवा संघ हि चळवळ महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात परीर्वतन वादी विचार घेवुन मागील तिस वर्षापासुन कार्यरत असुन ८५ % समाजाने अर्थ,शिक्षण,धर्म,राजकीय,प्रचार प्रसार या क्षेत्रात स्वताचे अस्तित्व निर्माण करुन शेती व शेतीशी निगळीत बहुसंख्य समाजाने यावर आपले नियंत्रण निर्माण करुन संत महापुरुषाच्या विचाराचा नागरीक निर्माण व्हावा या हेतुने कार्यरत आहे.अश्या या माणसाला माणसा सम वागविण्यार्या समतावादी संघटनेच्या वरोरा तालुका अध्यक्ष पदी शिवश्री.प्रभुजी देवेवार यांची नियुक्ती वरोरा येथे झालेल्या दिपक खामनकर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.बैठकीला मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडचे समन्वयक प्रा.दिलीप चौधरी सर,प्रा.सुनिल खरवडे,मा.जिल्हाध्यक्ष विर भगत सिंग विद्यार्थी परीषद,चंद्रपूर होते.तसेच कार्याध्यक्ष पदी विजयराव झाडे,सचिव पदी डाॅ.विराज टोंगे,कोषाध्यक्ष पदी विनोद इखार यांची नियुक्ती करण्यात आली तर सदस्य पदी अमोल लढी,ज्ञानेश्वर खांडेकर,संदिप सोनेकर,बाळूभाऊ लांडगे,यांची नियुक्ती करण्यात आली.बैठकीला भाष्कर कुडे सर,भानुदास राऊत,अरुण कापटे,प्रदिप कोहपरे,विनोद निमकर,चंद्रशेखर झाडे उपस्थित होते.अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल देशेवार यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
