तहसील कार्यालयात विना मास्क कर्मचारी, मात्र कारवाई दुकानदारांवर?

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

वरोरा शहराचे नवीन तहसीलदार बेडसें साहेब यांनी रुजू होताच वरोरा शहरातील दुकानांमध्ये जाऊन मास्क न वापरल्यास दंड ठोठावण्याची कारवाई केली गेली .यातून दुकानदाराना हजारो चा दंड बसविण्यात आला मात्र तहसील कार्यालयात कित्येक नागरिक कामानिमित्त येत असतात अश्यातच जर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मास्क वापरले नाहीत तरी कोरोना चा प्रसार होऊ शकतो याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले .लोकहीत महाराष्ट्र च्या प्रतिनिधी ना मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातील कर्मचारी विना मास्क तर काही कर्मचारी गळ्यात मास्क बांधून असल्याचे आढळले.यावर साहेब काय कारवाई करतील हे विशेष.