गाडी आमची डिझेल तुमचे “प्रहार रुग्णसेवक मिथुन कुडे , महेश पाटिल व आकाश बावणे यांचा एक अनोखा उपक्रम”

वरोरा:–लोकनायक बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मार्गदर्शन गजू भाऊ कुबडे , रुग्णसेवक गौरव दादा जाधव ,उमेश भाऊ महाडिक , नयनभाऊ पुजारी यांच्या मार्गदर्शखाली गोर गरीबरुग्णांसाठी खाजगी xylo गाडी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे , १० मे पासून २ xylo गाड्या गाडी आमची डिझेल तुमचे या तत्वावर रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे , बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा हाती घेउन रुग्णसेवा करत आहेत , रुग्णसेवक मिथुन कुडे , महेश पाटिल व आकाश बावणे यांनी हा उपक्रम राबविले आहेत , लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य गोर गरीब रुग्णांना गाडीचे पैसे देणे शक्य नाही त्या मुळे त्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा देत आहेत ,