
हिमायतनगर-प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर च्या वतीने तालुक्यातील तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तालुका अध्यक्ष डॉ. रविराज दूधकावडे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र सुरू असून यामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब शेतकऱ्याचे होणार आहे. कारण शेती संदर्भात केंद्र सरकारने तीन कायदे पारीत केले आहेत. ते जाचक आहेत. शेतकरी हिताचे नाहीत या नवीन तीन कायद्यास वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे. या तीन कृषी विरोधी कायद्या मुळे शेतकरी भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.
सदरील कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभाव खरेदी करण्याची मुभा कंपन्यांना मिळेल व हमीभावची व्यवस्था संपुष्टात येईल. त्याचप्रमाणे व्यापारी व कंपन्याना साठेबाजी करण्याची काय देखील भुमा मिळेल. हे जाचक कायदे आहेत. ते शेतकरी हिताचे नाहीत. ह्या नवीन कायद्यास वंचित बहुजन आघाडी चा विरोध आहे. शेतकरी विरोधी कायदा परत घ्यावा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने हिमायतनगर तालुका तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन चालणार आहे.
शेतकऱ्याच्या विरोधात केलेल्या काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी 27 जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. तहसील कार्यालया समोर 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उपाध्यक्ष व शहर अध्यक्षांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित रहावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष डॉ. रविराज दूधकावडे, जेष्ठ नेते गोविंद गोखले, गंगाधर वाघमारे,माजी सभापती पांडुरंग दुधाडे, पुंडलिक कदम, विलास नरवाडे, राजू वाठोरे, चंद्रकांत काळबांडे, संतोष खिलारे, साहेबराव राऊत, विशाल हनवते, शेख खयुम सोनारीकर, गणेश सूर्यवंशी, वैजनाथ पांचाळ,मारोती कदम, संभाजी राऊत, शरद हनवते, हर्षल हनवते, राजू हनवते, यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धकात म्हटले आहे.
