
प्रतिनिधी:प्रशांत बदकी
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षांपासून असलेली दारूबंदी ही केवळ नावापुरतीच शिल्लक आहे .ब्रम्हपुरी
शहरात अवैध दारू विक्री ला उधाण आले आहे .दारू बंदी झाल्यापासून दारू ची विक्री अधिकच वाढत गुंडेशाही ला यातून पाठबळ मिळत आहे.ब्रम्हपुरी तालुका भंडारा व नागपूर या जिल्ह्यांना लागून असल्याने या भागातून अवैधरित्या दारू पुरवठा होत आहे. तालुक्यातील नवरगाव,पिंपळगाव, हळदा,आवळगाव,गांगलवाडी,मुडझा तसेच ब्रम्हपुरी शहरातील बस स्थानक समोर ,संत रविदास चौक,मालडोंगरीं रोड व टिळकनगर यासारख्या भागात खुले आम अवैधरित्या दारू विक्री सूरु आहे यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनसे चे तालुकाध्यक्ष सुरजभाऊ शेंडे यांनी केली आहे.अवैधरित्या होणारी दारू विक्री बंद न झाल्यास मनसे साखळी आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
