
प्रतिनिधी:पियुष भोगेकर
वेकोली मधील खाजगी वाहन चालकाला किमान मानधन व पीएफ मिळावे म्हणून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी,वाहनमालक व वेकोलि अधिकााऱ्यांची माजरीत बैठक पार पडली
किमान मानधन, पीएफ यासह अन्य मागण्यांना घेऊन वेकोलिच्या माजरी क्षेत्रातील खासगी वाहनचालकांनी संप पुकारला होता. या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी रविवारी (ता. ७) बैठक पार पडली. या बैठकीत वाहनचालकांना १२ हजार रुपये मानधन देण्यासह अन्य मागण्या मान्य करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्याने वाहनचालकांनी संप मागे घेतला.
वेकोलिच्या माजरी क्षेत्रात माजरी, एकोणा, नागलोन, चारगाव, तेलवासा या कोळसा खाणी आहे. या खाणीत ४७ खासगी वाहने अधिकाèयांना ने-आण करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने लावण्यात आली आहे. या वाहनांवर जवळपास शंभराच्या आसपास वाहनचालक आहे. या वाहनचालकांना वेकोलि वेतन देते. मात्र, वाहनचालकांचे वेतन, पीएफच्या रकमेवर मूळ वाहनमालकांचा डोळा होता. गेल्या काही वर्षांपासून वाहनचालकांना अत्यल्प मानधन देऊन त्यांची पिळवणूक सुरू होती. वाढत्या महागाईच्या काळात छोट्याशा वेतनावर काम करणे कठीण होत चालल्याने या वाहनचालकांनी मनसेचे राहुल बालमवार व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. वाहनचालकांची ही अडचण लक्षात घेत त्यांनी वेकोलिच्या अधिकाèयांपुढे मांडली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे शंभराच्या आसपास असलेल्या वाहनचालकांनी संप पुकारला होता. या संपाने वेकोलितील वरिष्ठ अधिकाèयांची पंचाईत झाली. वाहने कार्यालयासमोर चालकांनी उभी ठेवल्याने त्यांच्या जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहनचालकांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने रविवारी बैठक बोलविण्यात आली. यात वेकोलिचे नायर, जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर,नागेश किन्नाके,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, करण नायर,अनुप माथनकर,कवडू चोपणे, गणेश ठाकरे यांच्यासह वाहनमालक उपस्थित होते. या बैठकीत वाहनचालकांना १२ हजार वेतन व पीएफ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य सुविधा देण्याबाबत वाहनमालकांनी होकार दर्शविला. त्यानंतर संप मागे घेण्यात आला.
