
हिमायतनगर प्रतिनिधी
नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष ,एकूण 37 रुग्ण पॉझिटिव्ह
तालुक्यात कोरोनाचा जोर सध्या चांगलाच वाढत असून शहरातील कालिंका गल्ली, रुक्मिणी नगर, छत्रपती नगर, परिसरा सह इतर ठिकाणी कोरोनाचे अनेक रुग्ण वाढत आहेत त्यामुळे जिल्हा पाठोपाठ शहर सुद्धा कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे मागील काही दिवसा पूर्वी शहरात 1 रुग्ण मिळाला होता पण आता एकूण 37 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत आणि अजुन दिवसेन दिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढतच आहे तरी पण शहरात कुठेच कोव्हिड केअर सेंटर नाही,कंनटोन्मेंट झोन नाही,ज्या गल्लीत जास्त रुग्ण आहेत तिथे ब्यारिकेट ची व्यवस्था नाही, त्यामुळे रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणात गैर सोय होत आहे ह्या बाबी कडे नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचे सद्या दिसून येत आहे येणाऱ्या काळात हिमायतनगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सद्या कोरोना बाधितांना औषध उपचार देऊन घरीच विलीनीकरणाचा सल्ला आरोग्य विभागा कडून दिल्या जात आहे पण गरीब वास्तव्य झोपडपट्टीत राहणाऱ्या रुग्णांना विलगिकरणात राहण्याची सोय सुद्धा उपलब्ध नाही व ग्रामीण भागातील नागरिकांना औषध उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेणे ही अवघड आहे शासनाने जिल्ह्यातील वाढत्या कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन मागच्या कालावधीत शहरात सुरू असलेले I T I येथील कोव्हिड केअर सेंटर तातडीने सुरू करावे अशी जनतेची मागणी आहे शहरातील श्रीमंत व धनदांडग्या लोकांना कोरोना झाल्यास ते स्वतःच्या प्रशस्त इमारतीत राहून उपचार घेत आहेत पण काहींनी तर नांदेड हैदराबाद सारख्या ठिकाणी जाऊन उपचार घेत आहेत त्यामध्ये शहरातील नगरपंचायत हद्दीत घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शहरात स्वच्छतेचा सुद्धा बोजवारा उडाला आहे हिमायतनगर येथील स्वच्छता कंत्राटदार सुद्धा या बाबीकडे कुठलेह्या प्रकारे गांभीर्याने लक्ष देत नाहीत त्यामुळे शहरात अनेक वार्डातील नाल्या भरून जात आहेत व शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे जागोजागी कचऱ्याचे ढीगारे वाढल्यामुळे शहरात रोगराई सुद्धा वाढली आहे या सर्व बाबीकडे नगरपंचायत प्रशासकांचे व लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील कोव्हिड केअर सेंटरचा प्रश्न तात्काळ मार्ग काढावा व येथील नगरपंचायत प्रशासन व आरोग्य प्रशासनात सक्तीचे आदेश द्यावे अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे
