मागील तीन चार वर्षांपासून ग्रामपंचायतीचे चाळीकडे दुर्लक्ष, गावातील सर्वसामान्य जनतेमध्ये प्रश्नचिन्हं !

प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर

नागाळा ग्रामपंचायत मधील चिंचाळा गावामध्ये गेल्या तीन चार वर्षा आधी ग्रामपंचायत ने बांधलेल्या चाळीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे .
कोरोना काळामध्ये सामान्य जनतेच्या हातातलं काम सुटलं ,काम मिळेना पोटाच्या भाकरी साठी जे काम मिळत ते करावं लागतं.
अशी परिस्थिती निर्माण झाली पण काही तरुण विद्यार्थ्यांनी रोजगार मिळत नसल्यामुळे स्वतःच काहीतरी करायची इच्छा जागृत झाली व ग्रामपंचायत ने बांधलेल्या चाळीकडे त्या तरुणाचं लक्ष वेधलं व सर्वसामान्य जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं !
गावकऱ्यांना आशा आहे की ग्रामपंचायत यावर लवकरात लवकर तोडगा काढतील.