
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं १ते१० या वार्डात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढले असून या कडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे असा भाजपा हिमायतनगर यांनी आरोप केला आहे त्यांनी आपल्या एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना कळविले आहे वारंवार सुचना देवुन देखील कोणत्याही प्रकारची मोहीम राबवली गेली नाही त्यामुळे वाढत्या दुर्गंधी मुळे नागरिकांना अतोनात त्रास होत या दुर्गंधी मुळे डेंग्यू मलेरिया सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच बरोबर विंधन विहीर बोअर ना दुरुस्त असल्याने काही ठिकाणी हातपपाचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे त्यामुळे त्या ठिकाणी नाल्या साफ सफाई नसल्याने पाणी जाग्यावर तुंबलेल्य असताना शासनाने संबंधित ठेकेदाराना जो साफसफाई चा कट्राक दिलेला आहे तो नाल्या वेळोवेळी उपसतो कि नाही या कडे मात्र नगरपंचायतीचे पुर्ण पणे दुर्लक्ष झालेले आहे जर का दोन दिवसांच्या आत यांवर विचार नाही झाल्यास किंवा जो कोणी ठेकेदार आहे त्याची योग्य चौकशी करून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी नाहीत तर भारतीय जनता पार्टी हिमायतनगर यांच्या वतीने ता अध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर उघ्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मा नायब तहसीलदार राठोड साहेब यांना देण्यात आले त्यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्ते भाजपा शहराध्यक्ष खंडु चव्हाण भा.युवा.मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी बालाजी ढोणे परमेश्वर सुर्यवंशी भाजपा ता सरचिटणीस विनोद दुर्गेकर सोशल मीडिया तालुका अध्यक्ष तथा बुथ प्रमुख विश्वनाथन देवसरकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते
चौकट…
जर दोन दिवसांत
नाल्या व विंधन विहीर बोअर दुरुस्त
नाही झाल्यास भाजपचे उघ्र स्वरुपाचे
आंदोलनाचा इशारा.
