
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
वरोरा31/3/21
शिवजयंती उत्सवानिमित्त वरोरा येथील द्वारकानगरी मधील हनूमान मंदिरात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील बर्याच भागात मोठ्या प्रमाणात भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती उत्सव साजरा करता येत नसल्याने बर्याच ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्त कमी भासनार नाही या दुष्टिकोनातून वरोरा शहरातील सेवा ग्रुप च्या यूवकांनी रक्त दान शिबिराचे आयोजन द्वारकानगरी परीसरातील हनूमान मंदिरात केले होते.या वेळी महाविद्यालयीन यूवक व यूवतीनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी सेवा ग्रुप फाऊंडेशनचे यूवा अध्यक्ष – निखिल मांडवकर उपाध्यक्ष – कृष्णा ढोके, वैभव ठाकरे, ऋतिक सावरकर, मोनेश भोयर, वैभव कोवे, सचिन डांगे,व परीसरातील मान्यवर उपस्थित होते.
