माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रयत्नास यश

परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील शिवसेनेचे प्रथम नगर अध्यक्ष कुणाला राठोड यांच्या प्रयत्नातून कनकेश्वर तलावाच्या सुशोभीकरण करण्यासाठी जवळपास एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरांमध्ये त्यांच्यावर फूलाचा वर्षाव होताना दिसुन येत आहे येणाऱ्या काही काळा मध्ये हिमायतनगर नगरपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निधी उपलब्ध करून दिला आहे असे चित्र दिसत आहे त्यामुळे शिवसेनेचे प्रभुत्व वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असताना देखील हिमायतनगर तालुक्याचा विकास कामांसाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील २६कोठी रुपये मंजूर करून आणले त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना व काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार का अशी चर्चा होताना दिसत आहे.
