माजी आमदार आष्टीकरांच्या सूचनेवरून शिवसैनिकांनी दिली कोव्हिड सेंटरला भेट, येथील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार माजी नगराध्यक्ष राठोड

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
कोरोना संसर्गजन्य आजारामुळे हिमायतनगर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच चाललेली आहे या आजाराने भयभीत झालेल्या रुग्णांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना येथील परिस्थितीचा आढावा फोनवर सांगितला असता त्यांनी तात्काळ येथील कोव्हिड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हिमायतनगर चे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड व शिवसैनिकांना पाठवले व तेथील रुग्णांना बेडशीट व कोव्हिड सेंटर येथील पाण्याचा प्रश्न औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पाठीमागे असलेल्या माजी नगराध्यक्ष यांच्या शेतातून येथील रुग्णांच्या सुविधेसाठी कायमस्वरूपी पाईप लाईन करून येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
या प्रसंगी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी.डी. गायकवाड साहेब, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे ,माजी नगरसेवक प्रतिनिधी सावन डाके शिवसेना शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार,गजानन चायल, युवा सेना उप शहर प्रमुख कल्याणसिंह(निक्कु) ठाकूर,सह आदी कर्मचारी होते
कोव्हिड सेंटर वर अ सुविधेचा अभाव
हिमायतनगर नगरपंचायत वर प्रशासक नेमण्यात आले तेव्हापासून शहरात covid-19 संदर्भात कुठेही नियम व अटींची बांधीलकी राहिली नाही असे शहरात दिसून येत आहे त्यामुळे रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढत आहे त्यामुळे शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील कोव्हिड सेंटर वर उपचार घेत आहेत पण तिथे कसल्याच प्रकारचे आरोग्य कर्मचाऱ्यांन कडून नियोजन दिसून येत नाही , rt-pcr टेस्ट संदर्भात आरोग्य कर्मचारी यांचे गांभीर्य नाही येथील रुग्णांना कसल्याही सुविधा वेळेवर मिळत नाही ,पोषक असे जेवण सुद्धा नाही त्यामुळे वरिष्ठांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे