लोकहीत महाराष्ट्र वरोरा च्या व्हाट्सअप ग्रुप शी जुळा आणि जाणून घ्या वरोरा तालुक्यातील प्रत्येक बातमी 👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY

वरोरा शहरात मागील काही दिवसांपासून अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ ही चिंतेचा विषय आहे .त्यामुळे ब्रेक द चेन या शासकीय निर्बंधांचे अवलंब करून सुध्दा मागील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे .त्यामुळे तालुक्यातील व्यापारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून शहरातील सर्व जीवनावश्यक वस्तू केंद्र , भाजीपाला केंद्रे,दुकाने पूर्णपणे बंद ठेवल्यास कोरोना ची प्रसार साखळी तोडण्यास मदत होईल .त्या अनुषंगाने वरोरा शहरात 13 एप्रिल ते 18 एप्रिल 2021पर्यन्त 6 दिवसाचा जनता कर्फ्यु ठेवण्याचे आवाहन वरोरा तालुक्यातील जनतेला प्रशासनातर्फे केले आहे .तसेच शहरातील नागरिकांना सारी चे कोणतेही लक्षण आढळत असल्यास त्याची चाचणी करून गरज भासल्यास विलगीकरणात ठेवण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.वरोरा तालुक्यात एक कोविड सेंटर असून देखील अजून सिद्धीविनायक मंगल कार्यालय, खांजी कोविड सेंटर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
