


प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळं,काटोल
राज्यातील २० कवींचा सहभाग
तालुका प्रतिनिधी/१७एप्रिल
काटोल – वेध प्रतिष्ठान, नागपूर तर्फे मराठी नववर्ष आरंभाचे औचित्य साधून ‘चैत्र पालवी’ काव्यमैफिल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.
काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ.गिरीश सपाटे तर मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध गझलकार नीलकांत ढोले, वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मनोहर नरांजे, सचिव खुशाल कापसे प्रामुख्याने उपस्थिती होते.
कवीसंमेलनाला नागपूर, वर्धा, गडचिरोली,चंद्रपूर,वर्धा अहमदनगर येथील २० कवींनी सध्याच्या जीवघेण्या कोरोना पासून तर प्रेम, विनोद, निसर्ग, चैत्र पालवी,गझल अशा अनेक विषयावर कवितेचे सादरीकरण केले.
काव्यमैफिलिचे प्रास्ताविक वसंत गोमासे,सुत्रसंचालन राजेश माहुरकर, परिचय किर्ती पालटकर तर आभार प्रदर्शन ओंकार पाटील यांनी केले.
काव्यमैफिलीत मनिषा उईके ,दिपा काकडे (गायकवाड), अमित धकाते, सुप्रिया झिंजुर्डे, वैशाली ठाकरे, सिमा उरकुडे, वसंत गोमासे,नेतराम इंगळकर, सुरेश शेंडे, उषा खंडागळे,दुर्गा ढोबळे,राजेश माहूरकर,आशा जिचकार, प्रांजली कुहिटे, डॉ.रत्ना गुजर शामकांत नेरकर, अश्विनी कल्हापुरे, संजय मांगे, विद्या टोंगस, डॉ.मनोहर नरांजे आदींनी सहभाग घेतला.
